शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे प्रसाद लाड यांच्या विजयाचा मार्ग मोकळा

शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे प्रसाद लाड यांच्या विजयाचा मार्ग मोकळा

मुंबई दि.२७ विधानपरिषद पोटनिवडणूकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केल्याने प्रसाद लाड यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिवसेनेच्या तीव्र विरोधानंतर भाजपने विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी प्रसाद लाड यांना उमेदवारी देत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना प्रतिक्षेत ठेवले आहे. काल रात्री प्रसाद लाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर लाड यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. विधान परिषद निवडणूक जिंकण्यासाठी १४५ मतांची गरज आहे. भाजपच्या  मतांची संख्या १२२ आहे तर; सेनेची संख्या ६३ आहे. दोन्ही पक्षाची एकूण संख्या १८५ होत असल्याने प्रसाद लाड यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Previous articleप्रसाद लाड यांना भाजपची उमेदवारी
Next articleविधानपरिषदेत ‘अदृश्य बाण’ चमत्कार घडवणार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here