कर्जमाफी सारखीच मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनाही फसवी

कर्जमाफी सारखीच मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनाही फसवी

धनंजय मुंडे याची टीका

औरंगाबाद दि. २७    चार महिने होऊनही शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळालेली नाही. कर्जमाफीच्या बाबतीत सरकारने शेतकर्‍यांची फसवणुक केली आहे. या फसवणुकी प्रमाणेच मुख्यमंत्री कृषी संजिवनी योजनेतही शेतकर्‍यांची फसवणुक केली असुन, ही संजिवनी योजना नव्हे तर वसुली योजना आहे अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर हल्लाबोल आंदोलन करण्यात येत असुन, या आंदोलनात आज धनंजय मुंडे यांनी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे सहभाग घेतला. कर्जमाफीची प्रतिक्षा करून शेतकर्‍यांचा सय्यम सुटला आहे. बोंडआळीच्या संकटाने शेतकरी उधवस्त झाला आहे. अशावेळी शेतकर्‍यांना दिलासा देण्या ऐवजी कृषी संजिवनी योजने सारख्या योजनांच्या नावाने शेतकर्‍यांची वसुली करून सरकार शेतकर्‍यांच्या जखमेवर मिठ चाळत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मागील सरकारच्या काळात अजित पवार उर्जामंत्री असतांना कृषी संजिवनी योजना सुरू करण्यात आली होती. त्यावेळी शेकर्‍यांना फक्त ५० टक्के थकबाकी भरावी लागत होती. तर उर्वरित ५० टक्के थकबाकी आणि दंडव्याज शासन देत असे मात्र या सरकारने हिच योजना मुख्यमंत्र्यांच्या नावे सुरू करून शेतकर्‍यांची वसुली सुरू केली आहे. या योजनेत शेतकर्‍यांना एकही रूपयांचा लाभ मिळणार नाही. तर केवळ ५ हप्त्यात संपुर्ण थकबाकी भरावी लागणार आहे. ही थकबाकी भरल्यानंतरही शेतकर्‍यांना दंड, व्याज माफ करण्याबाबतही सरकारच्या आदेशात स्पष्ट उल्लेख नाही. तर विचार करू असे पोकळ आश्वासन दिले आहे. याचाच अर्थ सरकार या योजनेतही शेतकर्‍यांची फसवणुक आणि वसुली करीत असल्याचा आरोप केला. कर्जमाफी आणि शेतकर्‍यांचे प्रश्न सुटल्याशिवाय अधिवेशन चालु देणार नसल्याचा इशारा ही त्यांनी यावेळी बोलतांना दिला.

Previous articleप्रसाद लाड यांच्याकडे २१० कोटी ६२ लाखाची संपत्ती !
Next articleदिलीप माने यांच्याकडे २० कोटी ९९ लाखाची संपत्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here