दिलीप माने यांच्याकडे २० कोटी ९९ लाखाची संपत्ती

दिलीप माने यांच्याकडे २० कोटी ९९ लाखाची संपत्ती

मुंबई दि.२७    विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी आमदार दिलीप माने यांची एकूण संपत्ती २० कोटी ९९ लाख असल्याचे त्यानी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून उघड झाले आहे.

माजी आमदार माने यांच्याकडे दोन कोटी तीस लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यामध्ये १२ लाख ४७ हजार रुपयांचे दागिने आहेत. चार लाख ७० हजार रुपयांची विमा पॉलिसी असून त्यांच्याकडे साडेपाच लाख रुपये रोख रक्कम आहे. त्यांची पत्नी जयश्री याच्याकडे दोन कोटी १८ लाख रुपयांची जंगम मालमत्ता असून त्यामध्ये सतरा लाख ७४ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आहेत. मुलगा पुथ्वीराज याच्याकडे एक कोटी २७ लाख रुपयांची जंगम मालमत्ता असून ८७ हजाराचे दागिने तर दोन लाख रुपये रोख स्वरूपात आहेत.
दिलीप माने यांच्या नावे असलेल्या स्थावर मालमत्तेचे मूल्य ७ कोटी ८१ लाख रुपयांचे इतके आहे. त्यामध्ये पुण्यातील कोंढवा येथील एक इमारत, सोलापूरच्या मजरेवाडी येथीलएक प्लॉट, दमाणीनगर येथील एक प्लॉट, कोंडी येथील तसेच कुमठे आणि तिरे येथील शेतजमीन यांचा समावेश आहे.

पत्नी जयश्री यांच्या नावे असलेल्या स्थावर मालमत्तेचे मूल्य दोन कोटी ५५ लाख इतके आहे. त्यात उत्तर सोलापूर तालुक्यातील मजरेवाडी येथील शेतजमीनीचा समावेश आहे. मुलगा पृथ्वीराज यांच्या नावे असलेल्या स्थावर मालमत्तेची एकूण किंमत चार कोटी ८३ लाख इतकी आहे. माने यांच्या नावे ७ कोटी १८ लाखाचे कर्ज आहे. पत्नीचे जयश्री यांच्या नावे २८ लाख १२ हजार तर मुलगा पृथ्वीराज याच्या नावावर तीन कोटी ८० लाख रुपये इतके कर्ज असल्याचे प्रतिज्ञापत्रात दाखवण्यात आले आहे.

दिलीप माने आणि त्यांची पत्नी या दोघांचाही मुख्य व्यवसाय शेती हा दाखवण्यात आला आहे. शेतीतून मिळणारे माने याचे वार्षिक उत्पन्न ३० लाख इतके असून त्यांच्या मुलाचे शेती मधील वार्षिक उत्पन्न १६ लाख रुपये आहे. दिलीप माने कला शाखेचे पदवीधर आहेत.

Previous articleकर्जमाफी सारखीच मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनाही फसवी
Next articleभाजपवालेच नोटाबंदीचे खरे लाभार्थी !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here