अखेर विजयकुमार गौतम यांची बदली

अखेर विजयकुमार गौतम यांची बदली

मुंबई, दि. २८    कर्जमाफीच्या संगणकीय प्रक्रियेत प्रमुख अडसर ठरलेले माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम अखेर बदली करण्यात आली. त्यांच्या जागी धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे विशेष सेवा अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्य सरकारने आज माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांच्यासह १० सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत.

विजयकुमार गौतम यांची वित्त विभागात (लेखा व कोषागारे) प्रधान सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. वित्त विभागात (लेखा व कोषागारे) कार्यरत असलेल्या वंदना कृष्णा यांची वित्त विभागात वित्तीय सुधारणा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. याठिकाणी कार्यरत असलेले आर. ए. राजीव यांची वित्त विभागात (व्यय) प्रधान सचिव पदावर नेमणूक करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. देसाई यांची संचालक, आपत्ती व्यवस्थापन विभाग, मंत्रालय, लातूर जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसाळ यांची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी विभागाचे आयुक्त म्हणून तर मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव सूरज मांढरे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. रोहयोचे आयुक्त एस. जी. कोलते यांची उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदावर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक राजीव निवतकर यांची मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी विपीन इटनकर त्यांची लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.

Previous articleछगन भुजबळ यांच्या समता परिषदेचे योगदान महत्वाचे
Next articleएसटी भरतीअंतर्गत ३ जिल्ह्यांचा निकाल लवकरच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here