पिडीतेला तिच्या कुटुंबियांना काही अंशी न्याय देणारा आणि समाधानकारक निकाल!

पिडीतेला तिच्या कुटुंबियांना काही अंशी न्याय देणारा आणि समाधानकारक निकाल!

धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

मुंबई दि.२९ कोपर्डी प्रकरणातील पीडितेचा जीव परत येणार नाही, तरीही तिन्ही आरोपीना फाशीच्या शिक्षेचा निकाल पिडीतेला आणि तिच्या कुटुंबियांना काही अंशी न्याय देणारा आणि समाधानकारक आहे. अशी प्रतिक्रिया कोपर्डी प्रकरणावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

हा निकाल वरिष्ठ न्यायालयात कायम राहून जेंव्हा तिन्ही आरोपी फाशीवर लटकतील तेंव्हाच पुर्ण न्याय मिळेल ही जबाबदारी राज्य शासनाची आहे. अशा शिक्षेमुळे गुन्हेगारांवर जरब निर्माण होऊन या पुढे अशा घटनांना पायबंद बसेल असेही मुंडे यांनी म्हटले आहे.राज्यातील महिलांच्या सुरक्षेची सरकारची जबाबदारी आहे. राज्याचे प्रलंबित महिला सुरक्षा धोरण तातडीने जाहीर करावे अशी मागणी करतानाच हा निकाल गुन्हेगारांना इशारा देणारा आणि न्यायव्यवस्थेवरचा विश्वास वाढवणारा आहे.या निकालासाठी प्रयत्न करणा-या सर्व यंत्रणाचे मी आभार मानतो असेही मुंडे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या इतर खटल्यांमध्ये ही जलदगतीने न्याय व्हावा यासाठीही सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

Previous articleआ. प्रकाश सुर्वेंवर कारवाईच्या मागणीसाठी तृप्ती देसाईंचा पोलीस उपायुक्त कार्यालयावर मोर्चा
Next articleमाझ्या छकुलीला न्याय मिळाला !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here