माझ्या छकुलीला न्याय मिळाला !

माझ्या छकुलीला न्याय मिळाला !

मुख्यमंत्री न्यायाधीश व समाजाचे आभार

निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया

मुंबई दि.२९   माझ्या छकुलीला न्याय मिळाला, अशी भावना कोपर्डी प्रकरणातील निर्भयाच्या आईने निकालानंतर व्यक्त केली. त्यांनी तपास अधिकारी, न्यायाधीश, मुख्यमंत्री आणि समाजाचे आभार मानले. ‘शाळेतील लहान लहान मुलांनी त्यांच्या ताईसाठी मोर्चे काढले. आज त्या मुलांच्या ताईला न्याय मिळाला,’ अशी भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले. यापुढे असा अत्याचार कोणावरही होऊ नये, असेही त्यानी म्हटले.

पोलिसांनी अतिशय मनापासून या घटनेचा तपास केला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अतिशय व्यवस्थितपणे आमची बाजू न्यायालयासमोर मांडली. त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद. न्यायालय आणि न्यायाधीश यांच्यावर आमचा विश्वास होता. तो विश्वास आज सार्थ ठरला. त्यामुळे न्यायाधीशांचेही आभार,’ अशा शब्दांमध्ये कोपर्डी प्रकरणातील निर्भयाच्या आईने तिच्या भावना व्यक्त केल्या.

सुप्रिया सुळे

कोपर्डी प्रकरणात सुनावलेल्या कठोर शिक्षेमुळे अशा वृत्तींना जरब बसेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खाहदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

 

विजया रहाटकर
अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग

गुन्हा नोंदविण्यापासून ते फाशीची शिक्षा होईपर्यंत वेगवान पद्धतीने न्यायदान झाले. या निकालाने कायद्याचे राज्य स्थापित होईल- विजया रहाटकर, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग.

अजित पवार

कोपर्डी प्रकणातील निकालाचं अजित पवारांकडून स्वागत. शिक्षेची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी.

Previous articleपिडीतेला तिच्या कुटुंबियांना काही अंशी न्याय देणारा आणि समाधानकारक निकाल!
Next articleपीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here