महिलांचा सन्मान राखण्यासाठी कोपर्डीचा निकाल महत्त्वपूर्ण

महिलांचा सन्मान राखण्यासाठी कोपर्डीचा निकाल महत्त्वपूर्ण

विखे पाटील

अहमदनगर दि. २९    कोपर्डी घटनेचा निकाल हा महिलांचा सन्मान राखण्यासाठी व अत्याचार रोखण्यासाठी पडलेले महत्त्वपूर्ण पाऊलअसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते  राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.समाजाच्या सर्व थरातील घटकांनी या अत्याचाराविरोधात उठवलेला आवाज पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देणारा ठरला असल्याचे त्यांनी सांगितले.

कोपर्डी घटनेच्या निकालानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, ही घटना अत्यंत संतापजनक होती. याची तीव्र प्रतिक्रिया समाजातील सर्व घटकांनी एकजूटीने दिल्यामुळेच घटनेचा तपास योग्य दिशेने झाला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडल्यामुळे हा निकाल न्यायालयीन इतिहासात मैलाचा दगड ठरला असल्याचे   विखे पाटील म्हणाले.

घटनेतील तीनही आरोपींना न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा विचारात घेता, भविष्यात अशा दुर्दैवी घटनांना पायबंद लागून, कायद्याचा धाक निर्माण होईल असा विश्वास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

Previous articleपोलीसांच्या गृह प्रकल्पांसाठी ‘आयआयटी’चे सहकार्य
Next articleजलदगती न्यायालयाला वेळेची मर्यादा हवी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here