महाराष्ट्राला महान बनविण्यासाठी परप्रांतीयांची गरज नाही

महाराष्ट्राला महान बनविण्यासाठी परप्रांतीयांची गरज नाही

मनसेचे प्रत्युत्तर

मुंबई दि.३० महाराष्ट्र पूर्वीपासूनच महान असल्यामुळे महाराष्ट्राला महान बनविण्यासाठी परप्रांतीयांची गरज नाही असे प्रत्युत्तर मनसेने मुख्यमंत्र्यांना दिले आहे. उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राच्या वैभवात भर घातली आहे. या लोकांनी मुंबईला महान बनवले आहे, त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राच्या वैभवात भर घातली आहे. परप्रांतातून आलेल्या लोकांनी आपले योगदान देऊन मुंबईला महान बनवले, मुंबईचा गौरव वाढवला असे वक्तव्य काल घाटकोपर येथिल एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खरपूस शब्दात समाचार घेतला आहे. ‘मुंबई आणि महाराष्ट्र यापूर्वीही महान होता, आहे आणि राहील. महाराष्ट्राला महान बनविण्यासाठी आश्रित म्हणून येणाऱ्या परप्रांतीयांची गरज नाही असे प्रत्युत्तर  मनसेने दिले आहे.  मनसेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी एका वृत्त वाहिनीला ही प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र उत्तर भारतीय आणि इतर राज्यातुन येणा-या लोकांमुळे महान होतो आहे, मुख्यमंत्र्यांचे हे म्हणणे हास्यास्पद आहे. परप्रांतातील लोक महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी येतात. त्यांच्या राज्यात विकास न झाल्यामुळे ते आपल्या राज्यात येतात. आश्रित म्हणून येणारे हे लोक मुंबई, महाराष्ट्राला महान कसे बनवू शकतात,’ असा सवाल सरदेसाई यांनी केला आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका म्हणजे परप्रांतीयांच्या मतांसाठी खटाटोप आहे. यामागे दुसरा-तिसरा काही हेतू नाही. यापूर्वी हे काँग्रेस करत होती. आता भाजपा करते आहे. ‘पार्टी विथ द डिफरन्स’ वगैरे काही नाही,’ असे सरदेसाई यांनी सांगितले. ‘सत्तेत असलेली लोक त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत नाहीत म्हणून मनसेला मराठी माणसाचा, मराठी भाषेचा मुद्दा उचलावा लागत असल्याचेही सरदेसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.

Previous articleउत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात
Next articleगुजरातमध्ये भाजपला १०७ ते ११० जागा मिळतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here