गुजरातमध्ये भाजपला १०७ ते ११० जागा मिळतील

गुजरातमध्ये भाजपला १०७ ते ११० जागा मिळतील

सट्टाबाजाराचा अंदाज

मुंबई दि.३०    उत्तर प्रदेश मधिल विधानसभा निवडणुकीत अंदाज चुकवत भाजपने दणदणीत यश मिळवत तब्बल ३२५ जागा जिंकत उत्तर प्रदेशची सत्ता हस्तगत केली. मात्र याचा फटका सट्टाबाजाराला मोठ्या प्रमाणात बसला होता. या निवडणुकीत अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे गुजरात निवडणुकीत ‘पंटर्स’नी सावध पवित्रा घेतला आहे. काँग्रेससह पाटीदार, दलित आणि ओबीसी समाजातील तरुण नेत्यांनी भाजपसमोर आव्हान उभे केले असले तरीही भाजप सत्ता राखेल, असा अंदाज ‘पंटर्स’नी व्यक्त केला आहे. भाजपला या निवडणुकीत १०७ ते ११० जागा मिळतील, अशी शक्यता या सट्टाबारवाल्यांनी वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेसला ७० ते ७२ जागा मिळण्याचा अंदाज असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

Previous articleमहाराष्ट्राला महान बनविण्यासाठी परप्रांतीयांची गरज नाही
Next articleनितेश राणेंची गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांना अब्रुनुकसानीची नोटीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here