प्रसाद लाड आणि दिलीप माने यांच्यात निवडणूक अटळ

प्रसाद लाड आणि दिलीप माने यांच्यात निवडणूक अटळ

दोघांचे अर्ज कायम

मुंबई दि .३०    येत्या ७ डिसेंबरला होणा-या विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काॅग्रेसचे दिलीप माने यांच्यात लढत होणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दोन्ही उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने हि निवडणूक चुरशी होणार हे स्पष्ट झाले आहे.आता या पोटनिवडणूकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजाराला ऊत येवून फोडाफोडीचे राजकारण रंगणार आहे. त्यामुळे या पोटनिवडणूकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता पण भाजपचे प्रसाद लाड आणि काॅग्रेसचे दिलीप माने या दोन्ही उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने निवडणूक अटळ आहे. सध्या विधानसभेत भाजपचे १२२, शिवसेनेचे ६३ , काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादी ४१, शेकाप आणि बहुजन विकास आघाडीचे प्रत्येकी ३ , पक्ष ७ एमआयएमचे २ तर; सपा, रासपा,मनसे आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीयाचे प्रत्येकी एक आमदार आहेत. उमेदवाराला जिंकण्यासाठी १४५ आकडा पार करावा लागणार आहे. त्यामुळे या निवडणूकीत फोडाफोडीचे राजकारण अटळ असून, मोठ्या प्रमाणात घोडे बाजार होण्याची शक्यता आहे.गुरूवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान घेण्यात येवून सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. शिवसेना आणि भाजपची युती असल्याने प्रसाद लाड यांचा विजय सहज होवू शकतो अशी शक्यता असली तरी या निवडणूकीत अदृश्य बाण चमत्कार करतील या आशेवर काॅग्रेस आहे.

सध्या विधानसभेत असणारे पक्षीय बलाबल पुढील प्रमाणे-

भाजप-१२२ , शिवसेना-६३,काॅग्रेस-४२, राष्ट्रवादी-४१,शेकाप-३,बविआ-३,एमआयएम-२,अपक्ष-७, सपा-१,मनसे-१,रासपा-१,कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया-१

Previous articleनितेश राणेंची गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांना अब्रुनुकसानीची नोटीस
Next articleमुख्यमंत्र्यांना ‘भय्याभूषण’ पुरस्कार द्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here