शेतकर्‍यांच्या नुकसानीस राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री जबाबदार

शेतकर्‍यांच्या नुकसानीस राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री जबाबदार

धनंजय मुंडे

यवतमाळ दि. ३० राज्यातील लाखो कापुस उत्पादक शेतकर्‍यांवर बोंडअळीचे संकट आले असतांना कृषी खाते झोपले होते का असा सवाल करीत बोंडअळीमुळे शेतकर्‍यांच्या झालेल्या कोट्यावधी रूपयांच्या नुकसानीस राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री हेच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

नाकर्त्या सरकार विरूध्द जनतेचा रोष व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने १ डिसेंबर पासुन सुरू होत असलेल्या यवतमाळ ते नागपुर हल्लाबोल पदयात्रेची माहिती देण्यासाठी आज यवतमाळ येथे खा सुप्रिया सुळे यांच्यासह पत्रकारांशी संवाद साधला, ही यात्रा विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपुर या ३ जिल्ह्यातुन जाऊन १२ डिसेंबर रोजी नागपुरच्या विधानभवनावर धडकरणार असल्याचेही ते यावेळी बोलतांना म्हणाले. राज्याचे कृषी खाते झोपले आहे. बोंडअळीच्या संकटासंदर्भात सरकारला कळवूनही दखल घेतली नाही. या संकटास राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री हेच जबाबदार आहेत असे ही मुंडे यांनी सांगितले. बोंडअळीच्या संकटांमुळे मराठवाडा आणि विदर्भात कापुस उत्पादक शेतकर्‍यांचे २५ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या भरपाई पोटी शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई अशी आमची मागणी आसल्याचेही ते म्हणाले. या मागणीसह तात्काळ सरसकट कर्जमाफडप्रया मागणीसह जनतेचा सरकारविरूध्द रोष रस्त्यावर दाखवुन देऊ त्याबरोबरच शेतकरी, जनता आणि विदर्भातील प्रश्नांवर नागपुर हिवाळी अधिवेशनात सरकारला जाबही विचारू असे ही ते यावेळी बोलतांना म्हणाले.

Previous articleराष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन ‘माणुसकीचे आंदोलन’ असेल
Next articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सुधारणाच्या धोरणाचे यश सिद्ध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here