…आणि सुप्रिया सुळेंनी त्या ” छकूलीला धीर दिला
यवतमाळ : कळंब तालुक्यातील सावरगावमधील फवारणीच्या विषबाधेने मृत्यू पावलेले शेतकरी गजानन फुलमाळी यांची कन्या प्रतिक्षा फुलमाळी हिने वडिलांचा कसा मृत्यू झाला याची कहानी जाहीर सभेत सांगितली. हे सांगताना तिला अश्रू अनावर झाले. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी तिच्याजवळ जावून तिला धीर दिला आणि यापुढे तिच्या कुटुंबाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेत असल्याचे जाहिर केले.
सभेच्या सुरुवातीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे भाषण झाले. ज्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणूकीत भाजपला भरभरुन मतदान केले.त्याच सरकारच्या काळात विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने इथून हल्लाबोल आंदोलन सुरु केले आहे असे सांगितले. या विदर्भाचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, कृषीमंत्री आहेत. परंतु असे असताना याच विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत. म्हणून या विदर्भाच्या मातीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलन सुरु केले आहे असे सांगतानाच मुंडे यांनी भाषणामध्ये आमच्या शेतकऱ्यांना दीड लाखाची कर्जमाफी नको आमच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी केली.
यवतमाळ जिल्हयातील आणि कळंब तालुक्यातील सावरगावमधील फवारणीच्या विषबाधेने मृत्यू पावलेले शेतकरी गजानन फुलमाळी यांची कन्या प्रतिक्षा फुलमाळी हिने वडिलांचा कसा मृत्यू झाला याची कहानी जाहीर सभेत सांगितली. हे सांगताना तिला अश्रू अनावर झाले. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी तिच्याजवळ जावून तिला धीर दिला आणि यापुढे तिच्या कुटुंबाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेत असल्याचे जाहिर केले.