निरूपम यांच्या घराबाहेर “आक्षेपार्ह” फलक

निरूपम यांच्या घराबाहेर “आक्षेपार्ह” फलक

मुंबई : मनसे आणि संजय निरूपम यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. काल काँग्रेस कार्यालयवर हल्ला केल्यानंतर निरुपम यांच्या घराबाहेर एक पोस्टर लावण्यात आले आहे. त्यावर निरुपम यांचा उल्लेख परप्रांतीय भटका कुत्रा असा करण्यात आला आहे. संजय निरूपम यांच्या लोखंडवाला येथिल घराबाहेर हे पोस्टर लावण्यात आल्याने या दोन पक्षातील वाद अजून चिघळण्याची चिन्हे आहेत.

कालच्या राड्यानंडर काल रात्री काँग्रेसच्या वांद्रे खेरवाडी मधील संपर्क कार्यालयावर रात्री अज्ञातांकडून शाईफेक करण्यात आली आहे तर काही प्रमाणात तोडफोडही करण्यात आली आहे.

Previous articleशेतकऱ्याला ना कर्जमाफी ना सरकारच्या योजनेचे फायदे !
Next articleशेतकर्‍यांच्या प्रश्नासाठीच्या आंदोलनाचा मुख्यमंत्र्यांना राग का ?