“हल्लाबोल” पदयात्रेला शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

“हल्लाबोल” पदयात्रेला शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकार विरोधी पुकारलेल्या हल्लाबोल पदयात्रेला दुसऱ्या दिवशी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सलग दुसऱ्या दिवशी पदयात्रेमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,खासदार सुप्रिया सुळे,विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील,विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील,माजी मंत्री अनिल देशमुख, राष्ट्रीय महिलाध्यक्षा फौजिया खान,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार विदया चव्हाण, आमदार रमेश बंग, आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार संदीप बजोरिया,यवतमाळचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले,महिला जिल्हाध्यक्षा क्रांती धोटे-राऊत,आमदार जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे, आदींसह पक्षाचे वरिष्ठ नेते, आजी-माजी आमदार,खासदार, पदाधिकारी, आणि महिला कार्यकर्त्या,कार्यकर्ते पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत.

दुसऱ्या दिवशी सुरु झालेल्या या पदयात्रेच्या सुरुवातीला मडकोना गावात सभा पार पडली. या सभेमध्ये विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. केंद्र आणि राज्यसरकारने जनतेला जी आश्वासने दिली.ती आश्वासने साडेतीन वर्षामध्ये एकही पूर्ण केलेली नाहीत. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवणाऱ्या या सरकारने फक्त शेतकऱ्यांची फसवणूकच केल्याची जोरदार टिका दिलीप वळसे पाटील यांनी केली.

दिलीप वळसे पाटील यांच्या भाषणानंतर या पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रेच्या दरम्यान प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

 

Previous articleशेतकर्‍यांच्या प्रश्नासाठीच्या आंदोलनाचा मुख्यमंत्र्यांना राग का ?
Next articleमुंबई काँग्रेसच्या कार्यालयावरील हल्ला भाडोत्री गुंडाकरवी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here