सहा महिन्यात प्लॅस्टिकवर बंदी

सहा महिन्यात प्लॅस्टिकवर बंदी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,:    येत्या सहा महिन्यात प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी आणून, पर्यायी व्यवस्था करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.आज राष्ट्रीय हरित लवाद व पर्यावरण विभागातर्फे एनसीपीएमध्ये आयोजित राष्ट्रीय पर्यावरण परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वातावरणात बदल होत आहे. पर्यावरणाचा प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी जनतेचा सहभाग फार महत्वाचा आहे. समुद्रातील प्रदुषित पाण्यामुळे अरबी समुद्र किनारा प्रदुषित होत आहे. यावर उपाय करण्यासाठी पाण्यावर प्रक्रिया करणार असून त्यासाठी पर्यावरण विभागाने काही नियम घालून दिले आहेत. लवकरच पर्यावरण विभागाच्या काही परवानग्या मिळणार आहेत. तीन-चार वर्षात हा प्रकल्प पुर्ण होईल. प्रदुषित पाणी समुद्रात सोडेलेले आढळणार नाही.

Previous articleसुप्रिया सुळेंनी घोटीतील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या
Next articleजिल्हा परिषदेच्या ४ हजार ३५३ शाळेत शून्य ते १० पटसंख्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here