जिल्हा परिषदेच्या ४ हजार ३५३ शाळेत शून्य ते १० पटसंख्या

जिल्हा परिषदेच्या ४ हजार ३५३ शाळेत शून्य ते १० पटसंख्या

मुंबई:    राज्यातील एकूण शाळांपैकी ५ हजार २ शाळांमधील मुलांची पटसंख्या शून्य ते १० या दरम्यान आहे.यापैकी ४,३५३ शाळा या जिल्हा परिषदेच्या आहेत (जिल्हा परिषद शाळांमध्ये ८०७२ शिक्षक आहेत.) आणि खाजगी अनुदानित शाळा ६९ आहेत (खाजगी अनुदानित शाळांमध्ये २२० शिक्षक आहेत.) अशा एकूण शून्य ते १० पटसंख्या असलेल्या एकुण ४४२२ शाळा आहेत. उर्वरीत ५८० शाळा या आदिवासी, विना अनुदानित, सामाजिक न्याय, स्वयंअर्थसहाय्यित आदी प्रकारात मोडतात. त्यामुळे तुर्तास या ५८० शाळांचा विचार करण्यात आलेला नाही. ४४२२ शाळामधून २८,४१२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. २०९७ शाळांचे स्थलातर होऊ शकते, मात्र त्यांना वाहनांची सोय उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. सर्वेक्षण करण्यात आलेल्या शाळांपैकी ९०९ शाळांचे स्थलांतर होऊ शकत नाही.

ज्या शाळा स्थलांतरीत करण्यात येणार आहेत त्यांची आकडेवारी खालीलप्रमाणे.

मुंबई उपनगर १,ठाणे ४५,पालघर ३२, रायगड १०३ जळगाव ८,धुळे ७,नंदुरबार ५,नाशिक ३१,पुणे ७६,सोलापूर २१,अहमदनगर ४९,कोल्हापूर ३४,रत्नागिरी १९२,सांगली १६,सातारा ७३,सिंधुदुर्ग १५५,औरंगाबाद ४०,जालना ६,परभणी १४,बीड २३,हिंगोली ४,लातूर ८,उस्मानाबाद ७,नांदेड ६८,अमरावती ४९,अकोला १८,वाशिम ९,यवतमाळ ३०,बुलढाणा ८,नागपूर २४,वर्धा २९,भंडारा १२,गोंदिया ३२,चंद्रपूर ५३,गडचिरोली ४२

Previous articleसहा महिन्यात प्लॅस्टिकवर बंदी
Next articleशिवसेनेचे गुजरातच्या शेतक-यांना “कर्जमाफीचे” वचन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here