ईव्हीएम मशिन …सत्ता..सत्तेचा महामार्ग! राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा

ईव्हीएम मशिन …सत्ता..सत्तेचा महामार्ग! राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा

मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपच्या सरकारवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून फटकारे ओढले आहेत. उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या पालिका निवडणूकीत मतदार याद्या आणि ईव्हीएम मशिनमध्ये गडबड झाल्याची कबुली उत्तर प्रदेश राज्याचे निवडणूक आयुक्त एस.के अग्रवाल यांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या निकालावर प्रश्न चिन्ह उपस्थित करीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अमित शहा हे ईव्हीएम मशिनवर उभे राहून विजयाची निशाणी करत असल्याचे रेखाटतानाच हेच मशिन भाजपसाठी सत्ता आणि सत्तेचा महामार्ग असल्याचे फटकारे लगावले आहेत. त्याच बरोबर प्रसार माध्यमाना लक्ष्य करताना, मालकांच्या दबावामुळे प्रचार माध्यमे शांत बसल्याचे या व्यंगचित्रात रेखाटले आहे.

Previous article…तर फडणवीस यांनाही लोक चोरांचे मुख्यमंत्री म्हणतील 
Next articleसर्वसामान्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here