कोल्हापूरात नारायण राणेंची तोफ धडाडणार!

कोल्हापूरात नारायण राणेंची तोफ धडाडणार!

येत्या ८ तारखेला राणेंची जाहीर सभा

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांची कोल्हापूर मध्ये येत्या ८ डिसेंबरला जाहीर सभा होणार असून,या सभेत ते काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

काॅग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, मात्र येत्या ७ डिसेंबरला होणा-या विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीमध्ये त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली नाही. शिवाय हिवाळी अधिवेशनापूर्वी होणारा मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबल्याने येत्या ८ डिसेंबरला कोल्हापूरमधिल ऐतिहासिक दसरा चौक येथे होणा-या जाहीर सभेत राणे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षाची स्थापनेवेळी राणे यांनी राज्यव्यापी दौ-याची घोषणा केली होती.त्यानुसार त्यांनी राज्याच्या दौ-याची कोल्हापूरपासून सुरूवात केली आहे.या दौ-या दरम्यान अनेक नेते राणे यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Previous articleडाॅ.आंबेडकर स्मारक भाजप सरकारने जाणीवपूर्वक रखडवले
Next articleमुंबईसह कोकणातील शाळा- महाविद्यालयांना उद्या सुट्टी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here