मुंबईसह कोकणातील शाळा- महाविद्यालयांना उद्या सुट्टी

मुंबईसह कोकणातील शाळा- महाविद्यालयांना उद्या सुट्टी

शिक्षणमंत्री विनोद तावडे

मुंबई, : अरबी समुद्रात ओखी चक्रीवादळामुळे बदललेली हवामानाची स्थिती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगर क्षेत्रासह सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालयांना उद्या ५ डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

ओखी चक्रीवादळामुळे बदललेली हवामानाची स्थिती आणि पावसाची शक्यता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ही एक दिवस सुट्टी देण्यात आली आहे.

Previous articleकोल्हापूरात नारायण राणेंची तोफ धडाडणार!
Next articleहुकुमशाही मानसिकतेच्या सरकारला विरोध सहन होत नाही