नारायण राणे दोन दिवसाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर

नारायण राणे दोन दिवसाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर

८ ते ९ डिसेंबरला कोल्हापूर,सांगली,सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे दोन दिवसाच्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.दोन दिवसाच्या या दौ-यात ते कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, कोल्हापूर येथिल ऐतिहासिक दसरा चौक येथे जाहिर सभा घेणार आहेत.

या दौ-यात त्याच्या सोबत त्याचे पुत्र माजी खासदार डाॅ निलेश राणे आणि पदाधिकारी असणार आहेत. ८ आणि ९ डिसेंबर अशा दोन दिवसाच्या या पश्चिम महाराष्ट्र दौ-यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे ८ डिसेंबर रोजी कोल्हापूर मध्ये कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेवून पक्ष संघटने संदर्भात चर्चा करणार असून , सायंकाळी ६ वाजता दसरा चौकांत त्यांची जाहिर सभा होणार आहे. ९ डिसेंबरला ते सांगली जिल्ह्याचा दौरा करतील. या ठिकाणी ते कार्यकर्त्यांच्या गाठीभेठी घेवून दुपारी सातारा जिल्ह्यातील कराड येथे पक्ष वाढीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आपल्या दोन दिवसाच्या दौ-यात राणे हे कोल्हापूर, सांगली आणि कराड मध्ये पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका मांडणार आहेत.

Previous articleनितीन आगे प्रकरणी आरपीआय ( खरात ) ची मंत्रालयावर धडक
Next articleग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे घेणार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरूवारी सरपंच दरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here