मोदी हे राहुलला स्पर्धक मानू लागले
मुंबई : राहुल गांधी यांनो मंदिरात जावून पूजा केली याचा भाजपाले संताप आला आहे. उलट राहुल गांधी मंदिरात गेले याचे स्वागत करायला हवे होते. राहुलचे मंदिरात जाणे हा एकप्रकारे हिंदुत्ववादाचा विजय आहे व बेगडी निधर्मवादापासून राहुल गांधी काँग्रेसला मवाळ हिंदुत्ववादाकडे नेत असतील तर संघ परिवाराने राहुल गांधींचा रेशीमबागेत सत्कार करायला हवा. राहुल यांचे अध्यक्ष होणे म्हणजे औरंगजेबाची राजवट असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. याचा अर्थ , मोदी हे राहुलला स्पर्धक मानू लागले असा टोला शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून भाजप आणि पंतप्रधान मोदींना लगावला आहे.
काय आहे अग्रलेखात
काॅग्रेसमध्ये घराणेशाही असल्याची टीका भाजपने सुरू केली आहे. राहुल गांधी हे मंदिरात गेले व पूजा केली याचाही भाजपास संताप आला आहे. उलट राहुल गांधी मंदिरात गेले याचे स्वागत करायला हवे होते. राहुलचे मंदिरात जाणे हा एकप्रकारे हिंदुत्ववादाचा विजय आहे व बेगडी निधर्मवादापासून राहुल गांधी काँग्रेसला मवाळ हिंदुत्ववादाकडे नेत असतील तर संघ परिवाराने राहुल गांधींचा रेशीमबागेत सत्कार करायला हवा. मात्र राहुलची ताजपोशी म्हणजे औरंगजेबाची राजवट असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. याचा अर्थ असा की, मोदी हे राहुलला स्पर्धक मानू लागले आहेत व राहुल नेतृत्व करण्यास सक्षम झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मनात औरंगजेबाच्या राजवटीविषयी भयंकर तिटकारा असेल तर त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आदेश द्यावेत व महाराष्ट्रातील औरंगजेब, अफझल खानाच्या कबरी खणून उद्ध्वस्त कराव्यात. आज या थडग्यांची तीर्थस्थाने बनली आहेत. ते संस्कृतीच्या विरोधात आहे. मोगल राजवटी म्हणजे क्रौर्याचा अतिरेक होत्या. सत्ता व सिंहासनासाठी मोगल राजे व युवराजांनी आपल्या बापाला, कुटुंबातील वडीलधाऱ्यांना बंदिवान बनवले. त्यांचा आवाज कायमचा दाबला व सिंहासने काबीज केली. मोगलांची राजवट फक्त काँग्रेस पक्षातच नव्हे, तर कोणत्याच पक्षात नसावी. राहुल गांधी काय करणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे!