आज काॅग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक
मुंबई : उद्या गुरूवार ७ डिसेंबर रोजी होणा-या विधानपरिषद पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काॅग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची संयुक्त बैठक आज सायंकाळी ६ वाजता मंत्रालया समोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार असून, या बैठकीत दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आदी नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.
उद्या होणा-या पोटनिवडणूकीत युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचे पारडे जड असले तरी त्यांचे दोन्ही काॅग्रेसच्या आमदारांशी सलोख्याचे संबंध असल्याने मते फुटू नये याची खबरदारी काॅग्रेसला घ्यावी लागणार आहे. आजच्या बैठकीत उद्या होणा-या मतदान प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यात येणार आहे.