भुजबळांच्या जामिनाला प्रभावित करण्यासाठी बातम्या पेरण्याचे षड्यंत्र

भुजबळांच्या जामिनाला प्रभावित करण्यासाठी बातम्या पेरण्याचे षड्यंत्र

आ.जयंतराव जाधव

नाशिक : ईडीने भुजबळांच्या मालकीच्या काही संपत्तीवर मंगळवारी जप्तीची कारवाई केल्याच्या बातम्या भुजबळांच्या विरोधकांनी माध्यमांमध्ये पेरल्या असून केवळ भुजबळांच्या जामिनाला प्रभावित करण्यासाठी हे षड्यंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जयवंतराव जाधव यांनी केला आहे.

आमदार जयवंतराव जाधव यांनी म्हटले आहे की, भुजबळांची मालमत्ता मंगळवारी जप्त करण्यात आल्याच्या बातम्या काही वर्तमानपत्रे व टीव्ही चॅनलवरून प्रसारित झाल्यात. सदर कार्यवाही अंमलबजावणी संचालनालयाने केली असे म्हटले आहे. मात्र ही जप्ती कायदेशीर दृष्ट्या चुकीची आहे. कारण यातील काही मालमत्ता छगन भुजबळांना त्यांच्या आजीकडून मिळाली आहे. तर काही मालमत्ता ही त्यांची वडिलोपार्जित असून त्यांनी त्यांच्या आमदार कोट्यातून घेतलेली आहे.  सदर मालमत्तेचा महाराष्ट्र सदन प्रोजेक्टशी कुठलाही संबंध नाही. या कारवाईला कुठलीही कायदेशीर पार्श्वभूमी नसतांना केवळ छगन भुजबळ यांच्या सध्या सुरु असलेल्या जामीन प्रक्रियेला बाधित करणे व वृत्तपत्रात व इतर माध्यमातून हेडलाईन तयार करण्याचा एक भाग असल्याचा आरोप करत मागील वर्षभरात ही कार्यवाही का केली गेली नाही असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला आहे.

सध्या काही वृत्तपत्र व टीव्ही माध्यमे तसेच समाज माध्यमावरून भुजबळांच्या विरोधात जामीनाला प्रभावित करण्यासाठी खोट्या बातम्या पेरल्या जात आहे. भुजबळ यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्याची न्यायालयीन सुनावणी सुरु आहे. त्याला भुजबळ कुटुंबांकडून पूर्णपणे सहकार्य केले जात असून आपली न्याय्य बाजू वकिलांमार्फत मांडली जात आहे. असे असतांना भुजबळ यांना जामीन मिळू नये यासाठी विरोधकांकडून अवास्तव व खोट्या बातम्या पसरविण्याचे काम केले जात आहे.  न्यायालयाची व जनतेची दिशाभूल करण्याचा हा कुटील डाव असून सुप्रीम कोर्टाने दिलेल्या कलम ४५ नुसार पी.एम.एल.ए कायदा असंवैधानिक घोषित केल्यानंतर यंत्रणांचा वेळकाढूपणा व विरोधकांचा खोडसाळपणा हा रडीचा डाव असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

 

Previous articleआज काॅग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक
Next articleपंचतारांकित “ताज हाॅटेलमध्ये” युतीच्या आमदारांची बैठक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here