पंचतारांकित “ताज हाॅटेलमध्ये” युतीच्या आमदारांची बैठक

पंचतारांकित “ताज हाॅटेलमध्ये” युतीच्या आमदारांची बैठक

मुंबई : उद्या गुरूवार ७ डिसेंबर रोजी होणा-या विधानपरिषद पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना आणि अपक्ष आमदारांची संयुक्त बैठक आज बुधवारी सायंकाळी ७ वाजता पंचतारांकित ताज महल हाॅटेलमध्ये आयोजित करण्यात आली असून,युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत युतीच्या आणि अपक्ष आमदारांसाठी पंचतारांकित मेजवानीचा बेत आखण्यात आला आहे. या बैठकीत दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. भाजपच्या आमदारांना भाजपचे मुख्य प्रतोद राज पुरोहित यांनी त्यासंदर्भात निरोप धाडले आहेत.

उद्या होणा-या पोटनिवडणूकीत युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचे पारडे जड आहे. शिवसेना भाजप आणि अपक्ष आमदारांना उद्या होणा-या पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करण्यासाठी पंचतारांकित ताज महल हाॅटेलच्या बाॅल रूममध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. एकीकडे दोन्ही काॅग्रेसच्या आमदारांची बैठक आज मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होत आहे तर; सत्ताधारी आमदार आणि अपक्ष आमदारांची बैठक पंचतारांकित ताज हाॅटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

Previous articleभुजबळांच्या जामिनाला प्रभावित करण्यासाठी बातम्या पेरण्याचे षड्यंत्र
Next articleओखी चक्रीवादळाच्या नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून भरपाई द्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here