सुप्रिया सुळेंनी केली विषप्राशन केलेल्या शेतकऱ्याची विचारपूस

सुप्रिया सुळेंनी केली विषप्राशन केलेल्या शेतकऱ्याची विचारपूस

वर्धा : अडीच लाखाच्या कर्जापायी विष घेतलेल्या वर्धा जिल्हयातील जुनोना गावातील शेतकऱ्याची कस्तुरबा हॉस्पीटलमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेवून विचारपूस केली.

सेलु तालुक्याच्या जुनोना गावातील शेतकरी मुरलीधर तुकाराम नागमोते याने साडे सात एकराची शेती ठेक्याने घेतली होती. या शेतामध्ये सोयाबीन,कापूस हे पीक घेतले परंतु हातातोंडाला आलेली पीकच गेल्याने या शेतकऱ्याने शेतामध्ये विष घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. मंगळवारी शेतात गेलेला हा शेतकरी घरी परत आला नसल्याने त्याची पत्नी शेतात गेली त्यावेळी मुरलीधर नागमोते बेशुध्द पडलेले दिसले. तात्काळ वर्धाच्या कस्तुरबा हॉस्पीटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी कस्तुरबा हॉस्पीटलमध्ये शेतकऱ्याची भेट घेत त्याची विचारपूस केली.त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्याच्या तब्येतीविषयी डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली

Previous articleआता मुंबईत “नो हॉर्न डे” उपक्रम
Next articleप्रसाद लाड यांचे एक मत कमी झाले !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here