प्रसाद लाड यांचे एक मत कमी झाले !

प्रसाद लाड यांचे एक मत कमी झाले !

राज्यमंत्री अर्जुन खोतकरांना मतदानाचा अधिकारच नाही !

मुंबई : भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना पाठिंबा दिलेल्या शिवसेनेचे नेते व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे विधानसभा सदस्यत्व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केल्याने उद्या गुरूवारी ७ डिसेंबर रोजी होणा-या विधानपरिषद पोटनिवडणूकीत अर्जुन खोतकर यांना मतदान करता येणार नसल्याने निवडणूकीपूर्वीच प्रसाद लाड यांना एका मताला मुकावे लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे विधानसभा सदस्यत्व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती ता.वि. नलावडे यांनी रद्द करण्याचा निर्णय काही दिवसापूर्वी दिला आहे. खोतकर यांच्या निवडीस काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि विजय चौधरी यांनी खंडपीठात आव्हान दिले होते. खोतकर यांनी आमदार म्हणून कुठल्याही निवडणुकीत मतदान करू नये तसेच कुठल्याही ठरावावर आमदार म्हणून स्वाक्षरी करू नये, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे उद्या होणा-या विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीत खोतकर यांना मतदान करता येणार नाही.

भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना शिवसेनेने पाठिंबा दिला असून, विधानसभेत शिवसेनेचे एकूण ६३ आमदार आहेत. परंतु खोतकरांची आमदारकी रद्द केल्याने शिवसेनेच्या ६२ आमदारांनाच उद्या होणा-या पोटनिवडणूकीच्या मतदान प्रक्रियेत सहभाग घेता येणार असल्याने प्रत्यक्ष मतदानापूर्वी भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना एका मताला मुकावे लागले आहे.

Previous articleसुप्रिया सुळेंनी केली विषप्राशन केलेल्या शेतकऱ्याची विचारपूस
Next articleकाॅग्रेसच्या बैठकीला आ. नितेश राणेंसह आ.कोळंबकरांची दांडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here