काॅग्रेसच्या बैठकीला आ. नितेश राणेंसह आ.कोळंबकरांची दांडी

काॅग्रेसच्या बैठकीला आ. नितेश राणेंसह आ.कोळंबकरांची दांडी

मुंबई : उद्या होणा-या विधानपरिषद पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काॅग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची संयुक्त बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आली होती मात्र या बैठकीकडे आमदार नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर यांनी पाठ फिरवल्याची माहिती समोर आली असल्याने काॅग्रेसपुढील अडचणीत वाढ झाल्याची चर्चा आहे.

उद्या होणा-या विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काॅग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची संयुक्त बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडली मात्र माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि काॅग्रेसचे आमदार निलेश राणे यांच्यासह राणे समर्थक आमदार कालिदास कोळंबकर यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील ,काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. सध्या विधानसभेत काॅग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादीचे ४१ सदस्य असले तरी आजच्या बैठकीला दोन्ही पक्षाचे मिळून केवळ ६० आमदार उपस्थित राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Previous articleप्रसाद लाड यांचे एक मत कमी झाले !
Next article४१ लाख शेतकऱ्यांसाठी १९ हजार ५३७ कोटी रूपये मंजूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here