पोटनिवडणूकीसाठी मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांनी केले मतदान

पोटनिवडणूकीसाठी मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांनी केले मतदान

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज सकाळी ९ वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मतदानाला सुरूवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरूवात झाली युतीचे प्रसाद लाड आणि काॅग्रेसचे दिलीप माने यांच्यात ही लढत होत असून, सकाळी ९ ते ४ या वेळेत विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात मतदान होत आहे . काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. शिवसेना , भाजप आणि अपक्ष आमदारांनी सकाळीच मतदानाला सुरूवात होताच मतदानासाठी विधानभवनात गर्दी केली होती. काॅग्रेस आणि राष्ट्रवादी व इतर पक्षाचे आमदारही मतदानासाठी विधानभवनात हजर असून,बहुतेक मंत्री , आमदारांनी मतदान केले आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून, सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

सध्या विधानसभेत असणारे पक्षीय बलाबल पुढील प्रमाणे-

भाजप-१२२ , शिवसेना-६३,काॅग्रेस-४२, राष्ट्रवादी-४१,शेकाप-३,बविआ-३,एमआयएम-२,अपक्ष-७, सपा-१,मनसे-१,रासपा-१,कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया-१-भारिप-१

Previous article४१ लाख शेतकऱ्यांसाठी १९ हजार ५३७ कोटी रूपये मंजूर
Next articleउध्दव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर पोलिंग एजंट ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here