उध्दव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर पोलिंग एजंट ?

उध्दव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर पोलिंग एजंट ?

भास्कर जाधव यांचा आरोप

मुंबई : विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मोठ्या उत्साहात मतदान सुरू असून, या ठिकाणी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर शिवसेनेची मते फुटू नये म्हणून मतदान केंद्रात युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.

मातोश्रीचा सीसीटीव्ही अर्थात मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेची मते फुटू नयेत म्हणून मतदान केंद्रात युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांच्या बाजूला बसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. दोन्ही पक्षाचा एकमेकांवर अविश्वास असल्यामुळे उध्दव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांना मतदान केंद्रात बसावे लागल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.

मिलिंद नार्वेकर हे प्रसाद लाड यांच्या विनंतीमुळेच पोलिंग एजंट च काम करत असून,शिवसेनेत कोणत्याही प्रकारची नाराजी नाही.शिवसेनेत पक्ष प्रमुखांच्या आदेशाच पालन होते त्यामुळे शिवसेनेचे एक ही मत फुटणार नाही, असे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Previous articleपोटनिवडणूकीसाठी मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांनी केले मतदान
Next articleपवनार मध्ये कापूस पिकावर धनंजय मुंडे यांनाचा फिरवायला लावला नांगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here