मी मत कोणाला दिले हे जगजाहीर

मी मत कोणाला दिले हे जगजाहीर

काॅग्रेस आ. नितेश राणे

मुंबई : विधानपरिषद पोटनिवडणूकीसाठी मतदान संपण्यासाठी एक तासाचा कालावधी बाकी असतानाच या निवडणूकीत क्राॅस वोटिंग स्पष्ट झाले आहे. “मी नारायण राणे यांचा कार्यकर्ता आहे” माझं मत कोणाला गेले हे जग जाहीर आहे.माझ्यावर कारवाई करण्याची कोणी हिम्मत तरी करू द्या मग बघू ,असे वक्तव्य करीत काॅग्रेसचे आमदार निलेश राणे यांनी अप्रत्यक्षरीत्या काॅग्रेस पक्षाला आव्हान दिले आहे.

विधानपरिषद निवडणूकीसाठी मतदान केल्यानंतर आ. नितेश राणे बोलत होते. “हात माझा होता पण डोके राणे साहेबांचे आहे. मी नारायण राणे यांचा कार्यकर्ता आहे” माझं मत कोणाला गेले हे जग जाहीर आहे असे सांगतानाच माझ्यावर कारवाई करण्याची कोणी हिम्मत तरी करू द्या मग बघू असे अप्रत्यक्षरीत्या त्यांनी काॅग्रेसलाच आव्हान दिले.

तर दुसरीकडे आण्णाभाऊ साठे महामंडळात घोटाळा केल्याचा आरोप असलेले आणि कारागृहातून मतदानासाठी आलेले राष्ट्रवादीतून निलंबित केलेले आमदार रमेश कदम यांनी तर उघडपणे आपण प्रसाद लाड यांना मतदान केल्याचे सांगितले.मी माझे मत प्रसाद लाड यांना दिले आहे. त्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता असे सांगण्यास आ. कदम विसरले नाहीत.

Previous articleपवनार मध्ये कापूस पिकावर धनंजय मुंडे यांनाचा फिरवायला लावला नांगर
Next articleएम.आय.एमचा मतदानावर बहिष्कार