एम.आय.एमचा मतदानावर बहिष्कार

एम.आय.एमचा मतदानावर बहिष्कार

मुंबई : आज पार पडलेल्या विधानपरिषद पोटनिवडणूकीच्या मतदानावर एम.आय.एमने बहिष्कार टाकला आहे. या पक्षाचे इम्तियाझ जलिल आणि वारिस पठाण यांनी मतदानावर बहिष्कार टाकला तर; राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे मतदानासाठी आले नाहीत. शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची न्यायालयाने आमदारकी रद्द केल्याने ते मतदानात भागशघेवू शकले नाही. विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी आज ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. एकूण २८८ पैकी २८४ आमदारांनी मतदान केले आहे. काही वेळातच मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

Previous articleमी मत कोणाला दिले हे जगजाहीर
Next articleप्रसाद लाड यांचा एकतर्फी विजय