प्रसाद लाड यांचा एकतर्फी विजय
लाड यांना २०९ तर; माने यांना ७३ मते
मुंबई दि .७ आज झालेल्या विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीत युतीचे उमेदवार प्रसाद लाड मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांना २०९ मते मिळाली तर; काॅग्रेसचे पराभूत उमेदवार दिलीप माने यांना केवळ ७३ मते मिळाल्याने विरोधकांची ९ मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण मतांपैकी दोन मते बाद झाली तर ; छगन भुजबळ मतदानाला करण्यासाठी येवू शकले नाहीत . एम.आय.एमने मतदानावर बहिष्कार टाकला होता. तर राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द झाल्याने ते मतदान प्रक्रियेत भाग घेवू शकले नाहीत.एकूण चार मतदार गैरहजर होते.
पक्षीय बलाबल पुढील प्रमाणे-
भाजप-१२२ , शिवसेना-६३,काॅग्रेस-४२, राष्ट्रवादी-४१,शेकाप-३,बविआ-३,एमआयएम-२,अपक्ष-७, सपा-१,मनसे-१,रासपा-१,कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया-१-भारिप-१