खोटे आकडे सांगण्यापेक्षा नावे जाहीर करण्याची हिंमत दाखवा

खोटे आकडे सांगण्यापेक्षा नावे जाहीर करण्याची हिंमत दाखवा

मुख्यमंत्र्यांना धनंजय मुंडे यांचे आव्हान

सेलू : रोज ट्वीट करुन कर्जमाफीचे खोटे आकडे सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्याची हिंमत दाखवावी असे थेट आव्हान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना सेलू येथे झालेल्या सभेत दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोल पदयात्रा सातव्या दिवशी वर्धा जिल्हयातील सेलू येथे आली.या सात दिवसात एकही कर्जमाफी झालेला शेतकरी मिळाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेली हल्लाबोल पदयात्रा आता सरकारला परवडणारी नसणार हे नक्की.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काढलेल्या हल्लाबोलमध्ये सरकारवरील राग व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने सहभागी होण्याचे आवाहन मुंडे यांनी केले.सभेमध्ये आमदार अमरसिंग पंडीत यांनी सरकारवर हल्लाबोल केला. या राज्यात कुणीच सुखी नाही.या राज्यात फक्त वरती नरेंद्र आणि खाली देवेंद्र सुखी आहेत असा आरोप त्यांनी केला.या सभेला खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर,आमदार विदया चव्हाण,आमदार जयवंत जाधव,आमदार सतिश चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,माजी आमदार संदीप बजोरिया, माजी आमदार सुरेश देशमुख, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, महिला जिल्हाध्यक्षा शरयू वांदिले,यवतमाळ जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले,युवक प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख आदींसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. या सभेला स्थानिक जनतेचा प्रतिसाद मोठया प्रमाणात मिळाला.

Previous article४१ लाख शेतक-यांना १९ हजार ५३७ कोटी रुपये मंजुर केल्‍याचा सरकारचा दावा खोटा
Next articleकर्जमाफीची मंजूर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here