जनतेला न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी स्वस्थ बसणार नाही

जनतेला न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी स्वस्थ बसणार नाही

खासदार सुप्रिया सुळे यांची जनतेला ग्वाही

वर्धा ( सेलडोह ) : महाराष्ट्रातील आणि विदर्भातील जनतेला जोपर्यंत न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी सेलडोह येथे झालेल्या सभेत दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोल पदयात्रा नवव्या दिवशी खडकी गावामधून प्रयाण केला. पुढे सेलडोह गावातील चौकामध्ये सभा पार पडली.यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी गरीब शेतकरी,कष्टकरी,व्यापारी,जीएसटी,नोटबंदी,कर्जमाफी असे सगळे गंभीर विषय घेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हल्लाबोल करत असल्याचे सांगतानाच १२ डिसेंबरला सरकारला जाब विचारण्यासाठी जनतेने सहभागी होण्याचे आवाहन केले.सभेच्या ठिकाणी केळी बागायतदार गीताबाई झांडे,पंकज झांडे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन दिले.त्या शेतकऱ्याने न्याय मिळवून देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली.

यावेळी माजी मंत्री जयंत पाटील,माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री भास्कर जाधव,माजी मंत्री गुलाबराव देवकर,आमदार राणा जगदिशसिंग,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,आमदार विदया चव्हाण,आमदार जयदेव गायकवाड,आमदार भाऊसाहेब पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, वर्धा जिल्हाध्यक्ष सुरेश राऊत, महिला जिल्हाध्यक्षा शरयू वांदिले, यवतमाळ जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले,जिल्हाध्यक्षा क्रांती धोटे-राऊत,प्रवक्ते महेश तपासे आदींसह असंख्य पदाधिकारी,कार्यकर्ते,शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous articleशनिवारी आणि रविवारी जिल्हा सहकारी बँका व प्रमुख बॅका सुरू राहणार
Next articleवैद्यनाथ दुर्घटना: मृतांच्या कुटूंबियांना प्रत्येकी सहा लाख तर; जखमींना दीड लाख रूपयांची मदत