एकनाथ खडसेंना १५ लाख ५० हजाराची थकबाकी भरण्याचे स्मरणपत्र

एकनाथ खडसेंना १५ लाख ५० हजाराची थकबाकी भरण्याचे स्मरणपत्र

मुंबई :  भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी  ‘रामटेक’ या शासकीय  बंगल्याच्या वापरापायी असलेली १५ लाख ५० हजाराची थकबाकी भरली नसल्यामुळे त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याने  स्मरणपत्र पाठविल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकारात सार्वजनिक बांधकाम खात्याने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना वितरित केलेला रामटेक या शासकीय बंगल्याबाबत माहिती विचारली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याने गलगली यांना दिलेल्या माहितीमध्ये एकनाथ खडसे यांनी  राजीनामा दिल्यानंतर १९ जून २०१६ रोजी त्यांनी बंगला खाली करणे आवश्यक होते. माजी मंत्र्यांस पहिले १५ दिवस शासकीय निवासस्थान निःशुल्क वापरता येते. मात्र त्यानंतर तीन महिन्यासाठी शासनाच्या परवानगीने प्रति वर्ग फुट ५० रूपये दराने आणि त्यानंतर पुढील तीन महिन्यासाठी शंभर  इतका दंड आकारण्यात येतो. निश्चित केला आहे. खडसे यांना तीन  महिने बंगला वापरण्याची परवानगी दिली होती.  खडसे  वास्तव्य करीत असलेले रामटेक ‘बंगला वापरापोटी असलेली १९ नोव्हेंबर २०१६ पर्यंत १५ लाख ४९ हजार ९७५ थकबाकी आहे.

 

Previous articleविरोधकांचा मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार ?
Next articleहल्लाबोल’ नव्हे हि तर “डल्लामार” यात्रा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here