हल्लाबोल’ नव्हे हि तर “डल्लामार” यात्रा

“हल्लाबोल’ नव्हे हि तर “डल्लामार” यात्रा

मुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादीवर टिका

नागपूर: विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. हि “हल्लाबोल’ नव्हे तर “डल्लामार” यात्रा असल्याची टिका त्यांनी राष्ट्रवादी काॅग्रेसवर केल्याने उद्यापासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

विरोधकांनी काढलेली यात्रा ही  हल्लाबोल नव्हे तर; डल्लामार यात्रा आहे अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.ज्यांनी हल्लाबोल यात्रा काढली आहे. त्यांचे डल्लामार पुरावे आमच्याकडे आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.विरोधकांची गाडी अजूनही सैराटवरच अडकली असून, त्यातून त्यांनी बाहेर पडण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली. आतापर्यंत ४१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यातील २१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी तर १२ लाख शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या अधिवेशनात १९ विधेयके मांडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Previous articleएकनाथ खडसेंना १५ लाख ५० हजाराची थकबाकी भरण्याचे स्मरणपत्र
Next articleशेतक-यांच्या आत्महत्या हे विरोधकांचे पाप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here