विधानपरिषदेत सत्ताधारी-विरोधक आमने सामने

विधानपरिषदेत सत्ताधारी-विरोधक आमने सामने

विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नागपूर : कर्जमाफीसह, बोडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना एकरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी. जोपर्यंत ही मागणी मान्य करीत नाही, तो पर्यंत कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेत जोरदार घोषणाबाजी करीत गोंधळ सूरू केल्याने सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी याला प्रत्युत्तर म्हणून जोरदार घोषणाबाजी सूरू केली. सभागृहातील गोंधळ वाढत गेल्याने चार वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतरही विरोधक आणि सत्ताधारी सदस्य समोरा समोर येवून जोरदार घोषणाबाजी करीत असल्यामुळे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. विरोधकांच्या गदारोळामुळे विधानपरिषदेचे सलग तीन दिवस कामकाज तहकूब झाले.

विधान परिषदेच्या कामकाजाला आज बुधवारी दुपारी  १२ वाजता सूरूवात झाली. सभापती रामराजे निंबाळकर यांनी प्रश्नोत्तरे पुकारताच महसूल मंत्री तथा सभागृहाचे गटनेते चंद्रकात पाटील यांनी हरकत घेतली. विरोधकांनी शेतकर्‍यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, बोंडअळीच्या नुकसानीची एकरी २५ हजार रूपये भरपाई जाहिर करावी, अशा घोषणाबाजी सूरू करताच सभापतींनी अर्धा तास सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्यानंतर पुन्हा कामकाजाला सूरूवात होताच उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी प्रश्नोत्तरे पुकारताच विरोधकांनी आक्रमक होत शेतकर्‍यांच्या प्रश्नावर जोरदार घोषणाबाजी सूरू करताच अर्ध्या तासासाठी सभागृह तहकूब करण्यात आले.

Previous articleखा. सुप्रिया सुळे यांनी दीक्षाभूमीवर जावून घेतले दर्शन
Next article“गिरीश महाजन हा गडी  वस्ताद आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here