आ. उदय सामंतांमुळे २ हजार सफाई कामगारांना न्याय मिळणार
नागपूर : १९८६ पासून रोजंदारीवर असलेल्या सफाई कामगारांना कायमस्वरूपी करावे अशी मागणी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी लावून धरली आहे. सफाई कामगारांच्या प्रश्नासंदर्भात आज राज्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत १९९३ पर्यंतचे सफाई कामगार कायम करावे हा नियम बदलून २००० साला पर्यंतचे सफाई कामगार कायम करावे या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचा पाठपुरावा १५ दिवसात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे २ सफाई कामगारांना होणार आहे.
सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात नगरविकास राज्य मंत्री रणजीत पाटील यांच्या दालनात आज बैठक पार पडली. या बैठकीला रत्नागिरीचे आ.उदय सामंत , मुख्याधिकारी अरविंद माळी, तसेच अनिल जाधव, लक्ष्मण कोकरे,अवी जाधव हे सफाई कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत १९९३ पर्यंतचे सफाई कामगार कायम करावे हा नियम बदलून सन २००० साला पर्यंतचे सफाई कामगार कायम करावे या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचा पाठपुरावा येत्या १५ दिवसात करून महाराष्ट्रातील सुमारे २ हजार सफाई कामगारांना न्याय देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती रत्नागिरीचे आ. उदय सामंत यांनी दिली. असा निर्णय घेण्यात आला. रत्नागिरी नगरपरिषदेतील तीन सफाई कामगारांच्या प्रश्नासाठी आ.उदय सामंत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे २ हजार सफाई कामगारांना आता कायम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.