आमदार ठरले कर्जमाफीचे “लाभार्थी”

आमदार ठरले कर्जमाफीचे “लाभार्थी”

नागपूर : पात्र शेतक-यांना कर्जमाफी मिळत नसल्याच्या कारणास्तव विधिमंडळात घमासान सुरू असतानाच कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार प्रकाश अंबिटकर हे कर्जमाफीचे लाभार्थी ठरल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

खासदार आमदारांसह त्यांच्या नातेवाईकांना कर्जमाफी देण्यात येत नसतानाही कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार प्रकाश अंबिटकर यांना आज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेकडून २५ हजाराची कर्जमाफी देण्यात आल्याचे दुरध्वनीवरून कळविण्यात आले आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत अनेक शिक्षकांसह आमदार अंबिटकर यांचेही नाव यादीत आल्याने त्यांनी हा प्रकार विधानसभेत आयत्या वेळच्या मुद्द्याद्वारे उपस्थित करून निदर्शनास आणून दिला. कर्जमाफी पात्र लाभार्थ्यांपर्यंत खरोखरच पोहचती का याचे हे ढळढळीत उदाहरण असून,एखादा आमदाराचे अशा यादीत नाव येणे ही गंभीर बाब असल्याचे आ. अंबिटकर म्हणाले.माहिती व तंत्रज्ञान विभागाचे काम हे चुकीच्या पध्दतीने चालले असल्याचे हे उदाहरण असून, असा प्रकार पात्र शेतक-यावर अन्याय करणारा असल्याचे आ. अंबिटकर यांनी सांगितले.

Previous articleसरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली
Next articleमंत्रालयातील सनदी अधिका-यांचे “पंचतारांकित” भोजन बंद करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here