मंत्रालयातील सनदी अधिका-यांचे “पंचतारांकित” भोजन बंद करा

मंत्रालयातील सनदी अधिका-यांचे “पंचतारांकित” भोजन बंद करा

आ. अनिल गोटे यांची मागणी

नागपूर : मंत्रालयातील सचिव दर्जाचे अधिकारी दुपारच्या जेवणासाठी घरी अथवा पंचतारांकित हाॅटेलमध्ये जात असल्याने कामानिमित्त मंत्रालयात आलेल्या सर्वसामान्य जनतेला तासनतास ताटकळत बसावे लागत असल्याने अशा अधिका-यांची पंचतारांकित परंपरा मोडीत काढण्याची मागणी धुळ्याचे भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आज विधानसभेत केली.

मंत्रालयातील सचिव दर्जाचे अधिकारी दुपारच्या भोजनासाठी घरी अथवा पंचतारांकित हाॅटेल्स मध्ये जात असल्याचे प्रकार सध्या घडत असल्याने याबाबत विचारणा केली असता ‘साहेब’ मिटिंगला गेले आहेत, साहेब विश्रांती घेत आहेत अशी अनेक कारणे देण्यात येतात.ग्रामीण भागातून कामानिमित्त मंत्रालयात येणा-या सर्वसामान्य जनतेला तासनतास ताटकळत बसावे लागते.वेळेची बचत व्हावी म्हणून मुख्यमंत्री स्वतःचा डबा घेवून येतात .मात्र सनदी अधिकारी जेवणाच्या नावाखाली दोनवदोनशतास खर्ची घालत असल्याने दुपारी जेवणासाठी घरी जाण्याची अशा अधिका-यांची परंपरा मोडीत काढण्याची मागणी आ. अनिल गोटे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे केली.

Previous articleआमदार ठरले कर्जमाफीचे “लाभार्थी”
Next article“टोलमुक्ती” वरून खडसेंनी चंद्रकांत दादांना विचारला जाब !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here