“टोलमुक्ती” वरून खडसेंनी चंद्रकांत दादांना विचारला जाब !
नागपूर : टोलमुक्त महाराष्ट्र घोषणेवरून माजी मंत्री एकनाथ खडसेंनी सरकारला आज अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारने ज्या रस्त्यांवर टोल बंद केले आहेत त्या रस्त्यांची दुरवस्थावरून आरोप करत खडसे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांना “टोल मुक्त महाराष्ट्र ” वरून जाब विचारला. त्याला राष्ट्रवादीचे अजित पवारांची यांनी साथ दिली.
रस्ते विकास महामंडळाने लहान गाड्यांचा टोल बंद केल्याने ४०० कोटी रुपये संबंधित कंपन्यांना परतफेड म्हणून देण्यात आले. परंतु मुंबई प्रवेशद्वारावर टोल बंद करण्यासाठी सरकारला अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. त्यामुळे मुंबई प्रवेशद्वारावर असलेल्या पाच ठिकाणचा टोल बंद करण्याचा निर्णय झालेला नाही अशी माहिती चंद्रकात पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या संदर्भातील अहवाल राज्याच्या वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. वित्त विभागाच्या अभिप्राय नंतर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे पाटील यांनी सांगून,राज्यातील ५३ टोलनाके बंद करण्यात आले.केवळ मोठ्या वाहनांना टोल आकाराला जातो. या पुढे टोल फ्री महाराष्ट्र करण्याचा सरकारचा मानस आहे. तसेच मोठ्या वाहनांना टोल न लावण्याचीही आमची भूमिका आहे असे स्पष्ट केले.