आ.नितेश राणेंबाबतचा अहवाल प्रदेश काॅग्रेसला सादर !
नागपूर : विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीत काॅग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मतदान केल्यानंतर विविध माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत “मी कोणाला मतदान केले आहे” हे जगजाहीर असल्याचे वक्तव्य केले होते.
काॅग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मतदानाच्या दिवशी केलेल्या वक्तव्याची सीडी आणि वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांच्या पुराव्यासह याबाबतचा अहवाल काँग्रेस पक्षाचे विधान परिषद पोटनिवडणूक मतदान प्रतिनिधी शरद रणपिसे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षाककडे पाठवला आहे. त्यानंतर तो अहवाल दिल्लीला वरिष्ठांकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर दिल्लीतील नेते आ. नितेश राणे यांच्यावर काय तो निर्णय घेतील अशी माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेची नुकतीच पोटनिवडणुक झाली. या मतदानानंतर आमदार नितेश राणे यांनी विविध माध्यमाकडे केलेली विधाने पक्षशिस्त मोडली जाईल अशी होती असे विखे पाटील म्हणाले.