विचार करायला लावणारा निकाल
अजित पवार यांची प्रतिक्रिया
नागपूर : गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल असे म्हणा-यांना गुजरातचा निकाल हा विचार करायला लावणारा असून,
या निकालामुळे कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळून उत्साह वाढल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अजित पवार म्हणाले की , गुजरातचा निकाल हा भाजपसाठी विचार करायला लावणारा आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणूकीकडे लागले होते. हि निवडणूक ऐकतर्फी होईल असे म्हणले जात होते मात्र गुजरात मध्ये काॅग्रेसने मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली त्यामुळे तेथिल जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला. या निकालाने सर्वांनाच प्रेरणा मिळाली असून, २०१९ नव्हे तर २०२४ च्या लोकसभेचे बोला असे म्हणणा-या भाजपला ही मोठी चपराक आहे असेही पवार यांनी सांगितले.
गुजरात मध्ये आघाडी कशामुळे झाली नाही हे मला माहित नाही पण सर्व विरोधी पक्षांनी एकोपा दाखवला असता तर आज वेगळे चित्र दिसले असते असे पवार यांनी सांगितले.आगामी निवडणूकीत सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची भूमिका घेतल्यास वेगळे चित्र दिसेल असे सांगतानाच या निकालाचा आगामी निवडणूकीवर परिणाम होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. गुजरातच्या निवडणूकीत राहुल गांधी यांची प्रतिमा कमी करण्याचा प्रयत्न भाजपने करत हि निवडून भाजप विरूध्द राहुल अशी असल्याचे चित्र निर्माण केले होते असे सांगून गुजरातचा निकाल हा प्रेरणा देणारा आहे असे पवार म्हणाले.