अधिका-यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका

अधिका-यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका

अजित पवार

नागपूर : गेल्या काही महिन्यात मुंबईत इमारती पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याने सरकारच्या वेगवेगळ्या यंत्रणा कमी पडत असल्याने अधिका-यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू करा असे बोल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांना सुनावले.

हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या आठवड्याच्या कामकाजाला सुरूवात होताच साकीनाका येथील दुकानाला आग लागून १२ जणांचा मृत्यू झालेल्या घटनेचे पडसाद विधानसभेत उमटले. काॅग्रेसचे सुनिल केदार यांनी हा मुद्दा उपस्थित करून या घटनेची वस्तुस्थिती सभागृहात देण्याची मागणी केली असता या घटनेकडे आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष देवून आहे.याची सर्व माहिती सभागृहात सादर करू असे मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले मात्र राष्ट्रवादीची नेते अजित पवार यांचे समाधान झाले नाही.अधिवेशन सुरू असताना अशा घटना घडल्यावर याची माहिती देणे गरजेचे आहे.गेल्या तीन महिन्यात सातत्याने घडत आहे. अशा घटना घडू नये म्हणून वेगवेगळ्या यंत्रणा कमी पडत असून, अधिका-यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका असे पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगत, ही बाब चिंतेची आहे सभागृह संपण्यापूर्वी या तिन्ही घटनांची माहिती सादर करावी अशी मागणी पवार यांनी केली.

Previous articleविचार करायला लावणारा निकाल
Next articleएकनाथ खडसेंनी सरकारला पुन्हा खडसावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here