एकनाथ खडसेंनी सरकारला पुन्हा खडसावले

एकनाथ खडसेंनी सरकारला पुन्हा खडसावले

नागपूर : हिवाळी अधिवेशात सातत्याने सरकारला अडचणीत आणणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा एकदा आपल्याच सरकारला खडसावले. शासनाच्या हलगर्जीपणामुळे जळगावातील हाफकिनचे युनिट बंद पडत चालले असल्याचे सुनावले.

विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात हिफकिन महामंडळाचा प्रश्न चर्चेला आला असता जळगावातील हाफकिनचे युनिट बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगून, या संस्थेत योग्य पगार मिळत नसल्याने संशोधक येत नसून, त्यांना इतरांपेक्षा कमी पगार मिळत असल्याने शासनाच्या हालगर्जीपणामुळेच हे युनिट बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे खडसे यांनी करून संशोधकांना आकर्षक पगार देण्याची मागणी केली. त्यानंतर सजेशन फाॅर अॅक्शन असे उत्तर अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिले.

Previous articleअधिका-यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका
Next articleपंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेचा असलेला विश्वास यामुळेच विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here