गुजरातमधील लाजिरवाण्या विजयाचे अभिनंदन !

गुजरातमधील लाजिरवाण्या विजयाचे अभिनंदन !

धनंजय मुंडे यांचे सत्ताधाऱ्यांना काढले चिमटे

नागपूर : मला लाजिरवाणा पराभव माहीत होता परंतु आज गुजरातमध्ये झालेल्या निवडणूकीमध्ये मी लाजिरवाणा विजय पाहिला असा चिमटा विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत सत्ताधाऱ्यांना काढला. दरम्यान लाजिरवाण्या विजयाबद्दल सत्ताधारी पक्षाचे अभिनंदनही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

आज गुजरातच्या विधानसभेच्या निवडणूकांचा निकाल हाती आला. जो गुजरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. त्या गुजरातमध्ये लोकांनी त्यांची वाईट अवस्था केली आहे. त्यामुळे वेळीच इथल्या सत्ताधाऱ्यांनी सुधरा. इथे मोदींची अस्मिता वाचवायला येणार नाही. इथे तुम्हालाच लढायचं आहे अशी खोचक टिका आणि काही फटकारेही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावले.

Previous articleरायगड जिल्ह्याच्या २४३ कोटीच्या पर्यटन आराखड्याला लवकरच मंजूरी
Next articleगुजरातचा निकाल भाजपसाठी इशारा