वैद्यकीय शिक्षण विभागात २९ कोटी रुपयांच्या ऑर्थोपॅडीक इम्पलांटसचा घोटाळा 

वैद्यकीय शिक्षण विभागात २९ कोटी रुपयांच्या ऑर्थोपॅडीक इम्पलांटसचा घोटाळा 

धनंजय मुंडे यांचा आरोप

नागपूर :  राज्यातील  महाविद्यालयांमध्ये लागणाऱ्या ऑर्थोपॅडिक इम्पलांटस (सांधेदुखीच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे) या उपकरणांची अवास्तव खरेदी करुन २९ कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत पुरवणी मागण्यांवर बोलताना केला.

१६ महिन्यांपूर्वी वैद्यकिय शिक्षण विभागाने २९ कोटी रुपयांची ही उपकरणे खरेदी केली. तीन लाख ५४ हजार ६४५ उपकरणांपैकी १५ महिन्यांत केवळ १५,३५४ म्हणजे पाच टक्केही वापर झाला नाही. अवास्तव खरेदीमागे मंत्रालय आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे संगनमत असून अवास्तव दराने या उपकरणांची खरेदी करण्यात आली असून आगामी १५ वर्षे ही उपकरणे संपणार नाहीत. या उपकराणांचा दर्जाही संशयास्पद असून उपकरणांचे सुट्टे भागही पुरविण्यात आलेले नाहीत. मुंबईच्या जीटी हॉस्पिटलला एक लाख ७४ हजार १८२ उपकरणे दिली त्यापैकी केवळ १५२ उपकरणांचा उपयोग झाला. हे उदाहरणादाखल सांगत राज्यातील ११ वैद्यकीय महाविद्यालयातील पुरवठा केलेल्या आणि प्रत्यक्षात वापरलेल्या उपकरणांची आकडेवारी त्यांनी पटलावर ठेवली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

Previous articleगुजरातमध्ये भाजपचा नैतिक पराजय
Next articleराज्याला कर्जबाजारी केले तरीही शेतकरी मात्र कर्जमुक्त नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here