आजचे निकाल भाजपच्या भविष्यातील शत प्रतिशत विजयाची नांदी

आजचे निकाल भाजपच्या भविष्यातील शत प्रतिशत विजयाची नांदी

पंकजा मुंडे

नागपूर : गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यात भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय ही तर भाजपच्या भविष्यातील शत प्रतिशत विजयाची नांदी आहे अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यांनी आजच्या निकालावर प्रतिक्रिया दिली.

दोन्ही राज्यात मिळालेला अभूतपूर्व विजय हा देशभरातील भाजपच्या तमाम कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा ठरला आहे. या राज्यात पन्नास टक्क्यांहून अधिक मतांवर भाजपचा प्रभाव दिसून आला आहे. भाजप आणि काॅग्रेस मधील मतांचे अंतर पाहता दोन्ही ठिकाणी काॅग्रेसला हरवून भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाने भाजपची देशात भविष्यातील शत प्रतिशत विजयाकडे वाटचाल स्पष्ट दिसून येत आहे असेही पंकजा मुंडे यांनी पुढे बोलताना म्हटले आहे.

Previous article
Next articleगुजरातच्या निकालामुळे राज्यात अजून स्थिर झालो