गुजरातच्या निकालामुळे राज्यात अजून स्थिर झालो

गुजरातच्या निकालामुळे राज्यात अजून स्थिर झालो

मुख्यमंत्री

नागपूर : गुजरात निवडणूकीत भाजपच्या मतांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गुजरातच्या निवडणूकीपूर्वी राज्यात वेगळे वातावरण तयार करण्यात आले होते मात्र गुजरातच्या निकालामुळे राज्यात आम्ही अजून स्थिर झालो असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

गुजरात राज्यातील निकाल हा अभुतपूर्व असा आहे. २२वर्षाच्या कार्यकाळानंतरही भाजपने विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवली आणि ५० टक्के मते मिळवली, यातुन गुजरात मधिल जनतेने भाजपवर विश्वास दाखवल्याचे स्पष्ट होते असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगून, गुजरात निवडणूकीपूर्वी महाराष्ट्रात जे वातारण निर्माण करण्यात आले होते ते निकालामुळे आता उलटे होवून राज्यात आम्ही अजून स्थिर झालो असल्याचे स्पष्ट केले. २०१६ नंतर राज्यात झालेल्या विविध निवडणूकीत भाजप हा प्रथम क्रमांकाचा पक्ष राहून मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. इतर सर्व पक्ष विरूध्द भाजप अशा या निवडणूका झाल्या तरीही भाजप विजयी झाल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी जनआक्रोश आणि हल्लाबोल मोर्चाचा समाचार घेताना वर्धा येथिल सभा वगळता राष्ट्रवादीच्या सभांना केवळ ३०० लोकांचीच गर्दी जमत होती असे सांगितले. नागपूरातील संयुक्त मोर्चाला दोन्ही काॅग्रेसने मोठी ताकद लावून सरकार विरोधी चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला मात्र हा मोर्चा पूर्णतः फसला असेही मुख्यमंत्री म्हणाले. एनडीए मध्ये सामिल झालेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश करणे हि आमची जबाबदारी असून , लवकरच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल असे संकेत दिले. राणेंचा समावेश हा भाजपच्या कोट्यातुन केला जाणार असल्याने शिवसेनेच्या नाराजीचा प्रश्न उदभवत नसल्याचे स्पष्ट केले. सध्या सुरू असणा-या अधिवेशनात माजी मंत्री एकनाथ खडसे हे सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत असले तरी ते ज्येष्ठ आणि प्रस्थापित नेते असल्याचे सांगत त्यांच्या अनुभवाची गरज सरकारला आहे असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

कोकणातील नियोजित रिफायनरी हि आंध्र प्रदेशात होणार होती मात्र हि रिफायनरी राज्यात आणण्यासाठी केंद्रियमंत्री अनंत गिते आणि शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आग्रही राहिल्याने हि रिफायनरी कोकणात आणल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगून , हि जगातील सर्वात मोठी आणि ग्रीन रिफायनरी असल्याचे स्पष्ट केले यामुळे कोकणातील शेतीवर, मासेमारीवर कसलाही परिणाम होणार नसून, पर्यावरणाला धोका निर्माण होणार नसल्याचे सांगितले. या प्रकल्पाची जमिन शेती योग्य नाही मात्र काही व्यवसायिक एनजीओ स्थानिकांना भडकावून आंदोलन करत असल्याचे स्पष्ट करून या प्रकल्पामुळे कोकणातील १ लाख स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याने हा प्रकल्प सुरू झाल्यावर कोकणातील एकही व्यक्ती मुंबईमध्ये नोकरीसाठी येणार नाही असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.

Previous articleआजचे निकाल भाजपच्या भविष्यातील शत प्रतिशत विजयाची नांदी
Next articleगुजरात मॉडेल डळमळले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here