मुंबई महानगरपालिका विभाजनाच्या मागणीवरून गदारोळ

मुंबई महानगरपालिका विभाजनाच्या मागणीवरून गदारोळ

नागपूर : साकीनाका येथे काल लागलेल्या आग प्रकरणी मुद्दा उपस्थित करतानाच मुंबई महानगरपालिका सर्वच विभागांना न्याय देऊ शकत नसल्याने मुबई महानगरपालिकेचे तीन भागात विभाजन करावे अशी मागणी काँग्रेस आमदार नसिम खान यांनी विधानसभेमध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे केली असता त्यांच्या या मागणीवर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.

नसिम खान यांच्या मागणीला तीव्र विरोध करत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबई मिळवण्यासाठी शेकडो हुतात्मा झाले आहेत, ही मागणी म्हणजे हुतात्म्यांचा अवमान असल्याचे म्हटले. यावेळी सभागृहात जोरदार गोंधळ झाला. गोंधळ सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नसिम खान यांची बाजू घेत, वाढत्या शहरांमुळे असे विभाजन करणे आवश्यक झाले असल्याची भूमिक मांडली. यामध्ये काहीही वादाचा विषय नाही. मात्र याला वेगळे स्वरूप दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे महानगरपालिका ही दोन विभागात आणण्याबाबत आम्ही विचार करत होतो असे पवार यांनी सांगितले.त्यानंतर झालेल्या गदारोळानंतर कामकाज अर्ध्यातासाठी तहकूब करण्यात आले.

अा. नसीम खान यांनी मुबईत घडलेल्या दुर्घटनेवरून मुबई महानगरपालिकेचे तीन भागामध्ये विभाजन करण्याची मागणी केली. अाम्ही त्यांच्या मागणीस विरोध केला असून, त्याला शिवसेनेचा देखील पाठिंबा दिला. नसीम खान यांनी सदरची मागणी मागे घ्यावे अशी मागणी शेलार यांनी केली. मुबंई महानगरपालिकेच्या विभाजनाच्या मागणी वरुन त्यांच्या मनात मुबईचे तुकडे करण्याचा डाव अाहे की काय अशी शंका निर्माण होते अशी टिका शेलार यांनी केली.

Previous articleगुजरात मॉडेल डळमळले आहे
Next articleसरकारलाच बोंड अळी लागली आहे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here